Karnataka SSLC Results | मराठी भाषा : आधी चूक, मग दुरुस्ती

निकालात मराठीचा उल्लेख टाळल्याने सीमाभागात संताप : शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करताच सुधारणा
Karnataka SSLC Results
गुणपत्रिकेत मराठी विषयाचा उल्लेखच नाही. हे दिसून येत आहे.
Published on
Updated on

बेळगाव : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने गुरुवारी (दि.23) दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. ऑनलाईन निकालात मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या पोर्टलवर ‌‘प्रथम भाषा मराठी‌’ असा उल्लेखच करण्यात आला नव्हता. यावर सीमाभागात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. शिक्षण खात्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. सदर चूक निर्दशनास आणून देताच शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने मराठी विषयाचा उल्लेख केला.

ऑनलाईन निकालाच्या पोर्टलवर इंग्रजी आणि कन्नड माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या विषयांचा आणि भाषांचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे. पण, मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांबाबतीत दुजाभाव करण्यात आला. निकालाच्या प्रतीमध्ये ‌‘मराठी‌’ हा शब्दच नाही. मराठी भाषेला जाणूनबुजून दुय्यम वागणूक दिली जात आहे का? अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.

दरवर्षी सीमाभागातील हजारो विद्यार्थी मराठी माध्यमातून ही परीक्षा देतात. अशावेळी बोर्डाच्या स्तरावर झालेली ही चूक अक्षम्य मानली जात आहे. याबाबत सीमाभागातील मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मात्र, अखेर शिक्षण खात्याने चूक निर्दशनास येताच दुरूस्ती केली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांतून समाधान व्यक्त होत आहे.

दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र प्रथम भाषा मराठी विषय ऑनलाईन उत्तरपत्रिकेमध्ये दिसत नव्हता. याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी ही तांत्रिक चूक आहे. याबाबत बंगळूर शालेय शिक्षण विभागाला त्याची माहिती दिली जाईल. त्यानंतर दुरूस्ती होईल, असे आश्वासन दिले.
-अंकुश केसरकर, अध्यक्ष म. ए. युवा समिती, बेळगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news