Karnataka Accident: गणपतीसाठी आलेल्या जवानाचा पत्नीसह माणिकवाडीजवळ मृत्यू

ट्रकची दुचाकीला धडक; सुटीच्या दुसऱ्याच दिवशी काळाचा घाला
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

खानापूर : समोरून येणाऱ्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने पती-पत्नी ठार झाल्याची घटना आज मंगळवारी रात्री साडेआठ वाजता खानापूर-रामनगर मार्गावरील माणिकवाडी क्रॉस जवळ घडली. या अपघातात युवराज शत्रुघ्न मळीक (वय ३०) व मोहिनी युवराज मळीक (२५) (दोघेही रा. जटगे, ता. खानापूर) या दोघांचा मृत्यू झाला.

युवराज भारतीय सैन्य दलात सेवेला होते. गणेशोत्सवासाठी ते सोमवारीच सुट्टीवर गावी आले होते. मंगळवारी खानापूर येथील काम आटोपून घरी परत जाताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. रामनगर येथून खानापूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून रामनगरच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली.

या धडकेत युवराज याच्या छाती व दोन्ही पायांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झाल्याने पत्नी मोहिनी यांना तातडीने खानापूर सरकारी दवाखान्यात नेण्यात आले; पण काही वेळातच त्यांचीही प्राणज्योत मालवली.

दुसऱ्या दिवशीही शोककळा

शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त राजहंसगडावर देवदर्शनासाठी जाणारे लक्केबैलचे पिता-पुत्र सोमवारी पहाटे तोपिनकट्टी गावाजवळ टेम्‍पोने दिलेल्या धडकेत मृत्युमुखी पडले होते. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी खानापूर तालुक्यात माणिकवाडी फाट्याजवळ असाच अपघात होऊन पती-पत्नी मृत्युमुखी पडले. त्यामुळे खानापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news