Karnataka School Roof Collapse: शाळेचे छत कोसळून ६ विद्यार्थी जखमी

सुदैवाने जीवितहानी झाली नाही
Karnataka School Roof Collapse
Karnataka School Roof Collapse
Published on: 
Updated on: 

जमखंडी : बागलकोट तालुक्यातील मुगलोळी तांडा येथील शासकीय शाळेच्या छताचे काँक्रीट कोसळून 6 विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची दुर्घटना बुधवारी घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्यात आले असल्याची अशी माहिती जिल्हापंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन बाळे यांनी दिली.

जखमी झालेले सर्व विद्यार्थी सुरक्षित असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाळेचे कोसळलेले छत तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश पंचायत राज अभियांत्रिकी विभागाला देण्यात आले आहेत. शाळा शिक्षण उपसंचालक (डीडीपीआय) स्वतः रुग्णालयात उपस्थित राहून जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची चौकशी व उपचारांची माहिती घेत आहेत.

शाळेची इमारत जीर्ण झाल्याने पालकांनी कायमस्वरूपी दुरुस्ती करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शाळेच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येईल, अशी ग्वाही सीईओ गजानन बाळे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news