

बंगळूर : राज्यातील किनारपट्टी आणि मलनाड जिल्ह्यामध्ये बुधवारी (दि. २२) पावसाने जोरदार हजेरी लावल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर आणखी चार दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील पश्चिम घाट आणि बेळगाव जिल्ह्यांमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे कृष्णा, घटप्रभा आणि मलप्रभा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. हिडकल जलाशयात रोज ११,७४९ क्युसेक आणि नविलुतीर्थ जलाशयात १,८१४ क्युसेक पाणी वाहत आहे. महाराष्ट्रातून कृष्णा नदीत ७५ हजार क्युसेक पाणी येत आहे.