Karnataka Bike Theft: चोरीच्या १९ दुचाकी जप्त; एकाला अटक

कुडची पोलिसांची कारवाई
Karnataka Bike Theft
Karnataka Bike Theft
Published on
Updated on

कुडची : रायबाग तालुक्यातील कुडची पोलिसांनी वाहन चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत एका संशयिताला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे ५ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या १९ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.

परमानंदवाडी येथील एका नागरिकाने दुचाकी चोरीची तक्रार कुडची पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत पोलिसांनी विशेष पथकाच्या मदतीने संशयिताला अटक केली. रायबाग तालुक्यातील चिंचळी येथील मलगौडा अण्णासाब पाटील असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

तपासावेळी संशयित विविध भागांतील वाहनचोरीच्या गुन्ह्यांत सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी संशयिताकडून १९ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून त्यांची अंदाजे किंमत ५ लाख ७५ हजार रुपये आहे. या कारवाईमुळे परिसरातील वाहनचोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हा पोलिस प्रमुख के. रामराजन, अतिरिक्त पोलिस अधिक्षक आर. बी. बसरगी, अथणी विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत मुन्नोळी, हारुगेरीचे पोलिस निरीक्षक रत्नकुमार जिरग्याळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तपास पथकात उपनिरीक्षक प्रीतम नाईक, उपनिरीक्षक पी. ए. माने, एएसआय के. आर. साळुंके, आर. एस. रबकवी, एच. एस. गुड्डाद, एस. एस. ससनूर, ए. ए. शांडगे, बनप्पा खोत, एम. बी. पाटील, एस. एस. फरनाकर यांच्यासह कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news