Karnataka Hindalga Prison: हिंडलगा कैद्याला नग्न कॉल

महिला पोलिस अधिकाऱ्याचा प्रताप; लोकायुक्तांकडे तक्रार
Karnataka Hindalga Prison
Karnataka Hindalga Prison
Published on
Updated on

बंगळूर : कधी गांजा, कधी मोबाईल, कधी कैद्यांमध्ये हाणामारी तर कधी थेट केंद्रिय मंत्र्यांना धमकीचे कॉल अशा प्रकारांनी बदनाम झालेल्या हिंडलगा कारागृहात आता नवीनच प्रकार उघडकीस आला आहे. दोन वर्षांपूर्वी बेळगावात सेवा बजावलेल्या आणि आता बंगळूरमध्ये सेवेत असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्याने हिंडलगा कारागृहातील एका कैद्याला नग्न व्हिडीओ कॉल केल्याचे उघडकीस आले आहे. कारागृहातीलच एका कैद्याने थेट लोकायुक्तांकडे या प्रकाराची तक्रार केली असून, कॉलमधील काही दृश्ये समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहेत.

सदर महिला पोलिस अधिकारी दोन वर्षांपूर्वी हिंडलगा कारागृहाच्या सेवेत होती. तेव्हाही ती अधिकारी कैद्यांकडून पैसे घेऊन त्यांना त्यांच्या घरचे जेवण देत असे. आताही तिने एका कैद्याकडून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारून त्याच्याशी अर्धनग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल केला होता. मुख्य म्हणजे त्यावेळी ती खाकी गणवेशातच होती आणि गणवेश उतरवतानाची दृश्ये मोबाईलमध्यै कैद झाली आहेत. हिंडलगा कारागृहातील अनेक कैदी तिच्या संपर्कात आहेत, असे तक्रारदार कैद्याने लोकायुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. कारवाईच्या भीतीमुळे इतर कैदी पुढे येत नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दोन वर्षांपूर्वीचा हा व्हिडीओ असून त्या व्हिडीओ कॉलमधील दृश्ये व्हायरल झाली आहेत. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने पोलिस विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गंभीर आरोप आणि व्हिडीओ पुरावे समोर आल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यावर अद्याप कोणती कारवाई करण्यात आली आहे, याबाबत स्पष्टता नाही.

लोकायुक्तांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी होऊन पुढील कारवाई काय होते, याकडे लक्ष लागले आहे. दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे समजते.

logo
Pudhari News
pudhari.news