RV Deshpande: आरव्हींना अखेर कॅबिनेट दर्जाचे पद

मंकाळ वैद्य आता विधानसभा उपाध्यक्ष
RV Deshpande
RV Deshpande
Published on
Updated on

बंगळूर : कर्नाटक सरकारने ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि नऊ वेळा आमदार राहिलेले आर. व्ही. देशपांडे यांची प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या यादीत नाव असूनही ऐनवेळी ते गाळले गेलेले कारवारचे आमदार मंकाळ वैद्य यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती होणार आहे.

कारवार जिल्ह्यातील हल्याळ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे देशपांडे दुसऱ्यांदा या आयोगाचे अध्यक्षपद भूषवतील. सिद्धरामय्या सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये त्यांची प्रथम या पदावर नियुक्ती केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news