Karnataka Crime: बारा वर्षांपासून फरार तोतया डीएसपीला अटक

लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आणि तब्बल १२ वर्षांपासून फरार असलेल्या संशयिताला विजापूर जिल्हा पोलिसांनी बंगळूरमधून अटक केली
Karnataka Crime: बारा वर्षांपासून फरार तोतया डीएसपीला अटक
Published on
Updated on

विजापूर : स्वतःला डीएसपी असल्याचे भासवून खाकी गणवेश परिधान करत बेरोजगार तरुणांना पोलिस, उपनिरीक्षक तसेच इतर सरकारी नोकऱ्या मिळवून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आणि तब्बल १२ वर्षांपासून फरार असलेल्या संशयिताला विजापूर जिल्हा पोलिसांनी बंगळूरमधून अटक केली आहे. ज्ञानगौडा उर्फ ग्याननगौड उर्फ गणेश उर्फ सी. संपतकुमार (वय 3, रा. वरगोडदिन्नी, ता. हुनगुंद, जि. बागलकोट) असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मार्च २०१४ रोजी विजापूर येथील एपीएमसी पोलिस ठाण्यात अपहरण, खुनाचा प्रयत्न आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. २०१२ मध्ये काखंडकी गावातील विठ्ठल छायागोळ यांच्या नातेवाईकाला पोलिस खात्यात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून आरोपीने १ लाख २० हजार रुपये उकळले होते. पण नोकरी न देता पैसे परत मागितल्यावर फिर्यादीचे गांधीनगर येथील स्टार चौकातून कारमध्ये अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासावेळी मुख्य त्‍याच्‍यासह एक महिला अशा तिघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते.

जामिनावर सुटल्यानंतर तो न्यायालयात हजर न राहता तब्बल १२ वर्षे फरार होता. फरार असतानाच २०२६ मध्ये ताळिकोटे पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. स्वतःला डीएसपी असल्याचे सांगून जेलर पदाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत मुद्देबिहाळ तालुक्यातील हंद्राळ गावातील रेवणसिद्धप्पा दोड्डमनी यांच्या मुलाकडून ८ लाख रुपये उकळून फसवणूक केल्याचा आरोप आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news