Karnataka Crime: पत्नीचा गळा दाबून खून करून अभियंत्‍याने जीवन संपवले

एका सिव्हिल इंजिनिअरने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून करून स्वताही जीवन संपवल्याची धक्कादायक घटना बंगळूर येथे घडली
Crime
Crime
Published on
Updated on

बंगळूर : कौटुंबिक वादातून एका सिव्हिल इंजिनिअरने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून करून स्वताही आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना रविवार दि. १६ रोजी हेग्गनहळ्ळी राजेश्वरीनगर बंगळूर येथे घडली आहे.

सुमंत (वय ३२) व त्यांची पत्नी पद्मावती (वय २९,रा. हुब्बळी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे लग्न चार वर्षांपूर्वी झाले होते. सध्या ते हेगनहळ्ळी येथील एका भाडोत्री घरात राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार या दाम्पत्यांमध्ये काही कारणाने जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी सुमंत याने पत्नी पद्मावतीच्या चेहऱ्यावर उशीने दाबत तिचा खून केला. दरम्यान पद्मावतीचा श्वास थांबल्याचे लक्षात येताच सुमंतने तात्काळ आपल्या आईला फोन करून घटनेची माहिती देत मी सुद्धा आत्‍महत्‍या करत असल्याचा संदेश पाठवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news