DK Shivakumar: मुख्यमंत्री शिवकुमार आज बेळगावात

मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी मुख्यमंत्री बेळगावात येत असल्यामुळे राजकीय चर्चांना वेग
DK Shivakumar
DK ShivakumarPudhari
Published on
Updated on

बेळगाव : मु्ख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच डी. के. शिवकुमार गुरुवारी (दि. ९) बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. ते दिवसभर विविध कार्यक्रमांत सहभागी होऊन रात्री बेळगावातच निवास करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी मुख्यमंत्री बेळगावात येत असल्यामुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे.

मुख्यमंत्री शिवकुमार सकाळी ९ वाजता बंगळूर येथून विशेष विमानाने बेळगावकडे निघणार आहेत. सकाळी १०.१० वाजता ते सांबरा विमानतळावर उतरतील. १०.३० वाजता ते सुवर्णसौधमध्ये पोचतील. बेळगाव प्रादेशिक विभागाची विकास आढावा बैठक ते घेतील. दुपारी ३ वाजता ते साखर कारखाना संघटनेबरोबर चर्चा करणार आहेत. संध्याकाळी ६.३० वाजता आरटीओ चौकातील काँग्रेस भवनला ते भेट देऊन ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ते बेळगावात निवास करणार असून शुक्रवारी (दि. १०) सकाळी विशेष विमानाने बंगळूरला रवाना होणार आहेत.

मुख्यमंत्री शिवकुमार बेळगावात थांबणार असल्यामुळे विविध संघटनांचे पदाधिकारी त्यांची भेट घेणार आहेत. कन्नड संघटनांचे म्होरकेची सीमाप्रश्नाचा महापालिकेत ठराव करणे, उच्चाधिकार समिती स्थापन करणे आदी मागण्यांसाठी भेट घेणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news