Karnataka Crime News | जमखंडी तुरुंगात कैद्यांमध्ये हाणामारी: भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या जेलरवर खुनी हल्ला!

बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तुरुंगातील धक्कादायक प्रकार : तांदूळ माफिया कैद्यांनी केलेले घृणास्पद कृत्य, जेलर व्ही.डी. कुंभार गंभीर जखमी
Karnataka Crime News
AI genreted Image
Published on
Updated on

काशिनाथ सुळकुडे

चिकोडी : एखादा गुन्हा केल्यानंतर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हेगारांना कारागृहात डांबले जाते. या कैद्यांनी चक्क कारागृहातील जेलर अर्थात कारागृह अधिकाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी उप-कारागृहात घडली.

संध्याकाळी जमखंडी शहरातील कारागृहात एका क्षुल्लक कारणावरून विचाराधीन कैद्यांमध्ये हाणामारी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि कैद्यांना शांत करण्यासाठी गेलेले जेलर अर्थात तुरुंग रक्षक व्ही. डी. कुंभार यांच्यावर कैद्यांच्या एका टोळीने अचानक हल्ला केला. कैद्यांनी केलेल्या मारहाणीमुळे तुरुंग रक्षकांचा डावा हात फ्रॅक्चर झाला आहे. यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जमखंडी शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

महालिंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेशन तांदळाच्या अवैध वाहतुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले झाकीर हुसेन मकंदर, फय्याज मकंदर, अशोक नायकोडी आणि अर्पत तालिकोटी असे आरोपींचे नावे आहेत. आता तुरुंगातही आपले धाडस दाखवणाऱ्या या टोळीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेसंदर्भात जमखंडी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news