Karnataka Crime: हुबळीत दुचाकी अडवून युवकाचा भररस्त्यात खून

शुक्रवारी दुपारी येथील लिंगराजनगर बनशंकरी वसाहत परिसरात ही घटना घडली
Karnataka Crime: हुबळीत दुचाकी अडवून  युवकाचा भररस्त्यात खून
file photo
Published on
Updated on

हुबळी : हुबळी येथे भरदिवसा रस्त्यावर एका युवकाचा तलवारीने वार करून खून करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी येथील लिंगराजनगर बनशंकरी वसाहत परिसरात ही घटना घडली.

दादापीर इस्माईलसाब उदयकर (वय ३३, रा. गिरीयाल रोड, शिवसोमेश्वरनगर, हुबळी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तो मूळचा हुबळीचा रहिवासी असला तरी सध्या कलघटगी तालुक्यातील बोगेनागरकोप्प येथे रहात होता.

दादापीर बनशंकरी वसाहत परिसरात दुचाकीवरून चालला असताना तिघांनी दुचाकी अडवून तलवार व इतर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. घटनेवेळी परिसरात बऱ्यापैकी वर्दळ होती. तरीही भर रस्त्यात सपासप वार करून खून करण्यात आला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. खून करून आरोपी पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news