Karnataka News: आरोपीला चक्‍क ५० रोपे लावण्‍याची शिक्षा

चिकोडीच्या जेएमएफसी न्यायालयाचा अनोखा, पर्यावरणपूरक निकाल
Karnataka News
Karnataka News: आरोपीला चक्‍क ५० रोपे लावण्‍याची शिक्षाPudhari
Published on
Updated on

​चिकोडी : मद्यधुंद अवस्‍थेत वाद व धिंगाणा घालणाऱ्या आरोपीला चिकोडीच्या जेएमएफसी न्यायालयाने एक अनोखी आणि पर्यावरणपूरक शिक्षा सुनावली आहे.

एकसंबा येथील रहिवासी अनिल निंगप्पा पुजारी असे या आरोपीचे नाव असून त्याने आपला गुन्हा स्वतःहून मान्य केला. न्यायालयाने त्याला तुरुंगवास किंवा दंडात्मक शिक्षेऐवजी ५० रोपे लावण्याची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या आदेशानुसार चिकोडी न्यायालय परिसरात २५ आणि सदलगा पोलिस ठाणे परिसरात २५ अशी ५० रोपे लावण्यात आली.

न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत अनिल पुजारी याने पत्नीसोबत ५० रोपे लावली. गुन्ह्यासाठी पारंपरिक कारावास किंवा दंडात्मक कारवाई करण्याऐवजी थेट पर्यावरण संवर्धनाला हातभार लावणारी ही शिक्षा सुनावल्यामुळे चिकोडी न्यायालयाच्या या निकालाचे सर्वसामान्यांकडून कौतुक होत आहे. ‘गुन्ह्याला शिक्षा आणि पर्यावरणाला योगदान’ असा महत्त्वपूर्ण संदेश देणारा हा निकाल सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news