Karnataka CM Medal | राज्यातील १५३ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री पदक जाहीर; बेळगाव जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश

संतोष सत्यनायक, राघवेंद्र हवालदार, कुमार हाडकर, सुनिल कांबळे, जगदीश कद्रोळी यांच्यासह बेळगाव जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश
Police Medal Winners Belagavi Karnataka
संतोष सत्यनायक, राघवेंद्र हवालदार, कुमार हाडकर Pudhari
Published on
Updated on

Police Medal Winners Belagavi Karnataka

निपाणी : राज्यातील १५३ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगल्या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री पदक जाहीर असून गुरुवारी (दि.२) बंगळूर येथे वितरण होणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील पाच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यसरकारच्या गृहखात्याने हे पदक जाहीर केल्याने संबंधितांचे अभिनंदन होत आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा राज्याचे पोलीस महासंचालक एम. ए. सलीम यांनी प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार बेळगाव येथील मार्केट पोलीस ठाण्याचे डीएसपी संतोष सत्यनायक, गुप्तचर खात्याचे डीएसपी राघवेंद्र हवालदार, ऐगळी पोलीस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक कुमार हाडकर, बेळगाव येथील डीसीआरई विभागाचे हवालदार सुनिल कांबळे, खानापूर येथील हवालदार जगदीश कद्रोळी यांचा यामध्ये समावेश आहे.

Police Medal Winners Belagavi Karnataka
Belagavi GST scam: बेळगावच्या जीएसटी घोटाळ्याची व्याप्ती वाढती

यामध्ये सध्या कुमार हाडकर हे बंगळूर येथील लोकायुक्त विभागात बढतीवर सीपीआय पदावर सेवेत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनात चांगली कामगिरी करून अनेक गुन्ह्यांचा वेळीच तपास केल्याने त्यांच्या कामाची दखल घेऊन हे पदक जाहीर केले आहे. याचे वितरण गुरुवार (दि. २) रोजी बंगळूर येथे केएसआरपीसी मैदानावर, पोलीस ध्वज दिनी होणार आहे.

संतोष सत्यनायक यांची महापूर, कोरोना काळात दमदार कामगिरी

यामध्ये मुख्यमंत्री पदक जाहीर झालेले संतोष सत्यनायक हे मूळचे संकेश्वरचे रहिवासी असून त्यांची आतापर्यंत पोलीस खात्यात २६ वर्ष सेवा झाली आहे. त्यांनी ८ वर्षे फौजदार व १४ वर्षे सीपीआय म्हणून विविध ठिकाणी काम केले आहे. गेल्या दीड वर्षापासून ते बेळगाव मार्केट पोलीस ठाणे येथे एसीपी रेंजमध्ये डीएसपी पदावर कार्यरत आहेत. ते २०१९ मध्ये निपाणी सर्कलमध्ये कार्यरत असताना महामार्गावरील यमगर्णी नदी पुलावर आलेल्या महापूर काळात तसेच सन २०२०-२१ साली कोरोना काळात कोगनोळी टोलनाका येथे प्रभावी काम करून कर्तव्यनिष्ठ कामगिरी केली होती. या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांना मुख्यमंत्री पदक जाहीर करून त्यांची कार्याची पोचपावती दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news