Karnataka Politics | मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात?

राहुल गांधी अंतिम यादी जाहीर करणार; दिल्‍लीतील आंदोलनामुळे विलंब
DK Shivakumar Cabinet
DK Shivakumar Cabinet
Published on
Updated on

बंगळूर : नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणावरून दिल्‍लीत सुरू असलेल्‍या आंदोलनामुळे पुढे ढकलण्यात आलेला राज्य मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात होऊ शकतो, असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दोनवेळा दिल्लीला जाऊन हाय कमांडशी चर्चा केली. मात्र, अजून अंतिम निर्णय झालेला नाही. या नेत्यांनी स्वतंत्र याद्या राहुल गांधी यांच्‍याकडे सादर केल्या आहेत. खासदार शशिकांत सेंथिल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने छाननी करून अहवाल सादर केला केला असून त्या आधारावर यादी जाहीर होणार आहे.

यासंदर्भात शुक्रवारी रात्री बंगळूरमध्ये बैठकीची एक फेरी पार पडली. एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, रणदीपसिंग सुरजेवाला यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. संभाव्य मंत्र्यांच्या यादीबाबत राहुल गांधींनी सुचवलेल्या निकषांशी जुळणाऱ्या नावांची राज्य नेत्यांनी शिफारस केली आहे. वेणुगोपाल ही यादी घेऊन दिल्लीला रवाना झाले आहे. याबाबत राहुल गांधी अंतिम निर्णय घेतील. त्यानंतर अंतिम केलेली यादी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे पाठवले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली असून सोमवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्‍याची शक्‍यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news