Karnataka Buffalo Theft : ओलमणीतून म्हशींची चोरी

ओलमणी (ता. खानापूर) येथील गोठ्यात बांधलेल्या दोन दुभत्या म्हशी चोरीला गेल्याची घटना शनिवारी ( दि.२४) सकाळी उघडकीस आली
Karnataka Buffalo Theft
ओलमणी : चोरीला गेलेल्या म्हशी.
Published on: 
Updated on: 

खानापूर : ओलमणी (ता. खानापूर) येथील गोठ्यात बांधलेल्या दोन दुभत्या म्हशी चोरीला गेल्याची घटना शनिवारी ( दि.२४) सकाळी उघडकीस आली. मारुती पवार यांच्या शेतातील गोठ्यात नेहमीप्रमाणे त्यांनी म्हशी बांधल्या होत्या.

शनिवारी सकाळी वैरण टाकण्यासाठी गेले असता त्यांना गोठ्यातून म्हशी गायब असल्याचे दिसून आले. याबाबत खानापूर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली. पवार यांचे शेतातील घर खानापूर जांबोटी मुख्य रस्त्यालगतच आहे. या रस्त्यावरून रात्रीचीही वर्दळ सुरू असते. अशा ठिकाणी गोठ्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून म्हशींच्या गळ्यातील दोरी कापून चोरीची घटना घडली आहे.

चोरीला गेलेल्या दोन्ही म्हशींची एकूण किंमत दोन लाख रुपये इतकी आहे. ओलमणी, जांबोटी परिसरात अनेक शेतकऱ्यांचे शेतामध्ये व घरापासून लांब अंतरावर गोठे आहेत. दिवसभर शेतात काम करून जनावरांना गोठ्यात बांधून शेतकरी घरी येतो. पण जनावरांच्या चोरीच्या घटनेमुळे शिवारामध्ये जनावरे बांधून येणे धोकादायक ठरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news