Karnataka Bomb Threat : मुख्यमंत्री निवास, विधानसौधमध्ये बॉम्बची धमकी

संशयिताला अटक, कॅबचालकाच्या मोबाईलवरून पोलिसांना इशारा
Bomb Threat
Bomb ThreatPudhari
Published on: 
Updated on: 

बंगळूर : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे सदाशिवनगर येथील निवासस्थान व विधानसौधमधील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या कार्तिक नामक व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. नम्म यात्री ॲपवर रिक्षा आरक्षित करून रिक्षाचालकाच्या मोबाईलवरून पोलिसांशी संपर्क साधत कार्तिकने धमकी दिली होती.

कार्तिक ऑटोचालकाला मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या निवासस्थानासमोरील बॅरिकेडजवळ येण्यास सांगितले होते. त्यानुसार ऑटोचालक भगवंतराय निर्धारित वेळेत ठिकाणी पोहोचले. थोड्याने वेळाने त्यांनी ऑटो बुकिंगसाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केला. फोन उचलणाऱ्या कार्तिकने तेथे उभ्या असलेल्या एखाद्या पोलिसाकडे फोन देण्यास सांगितले. त्यानुसार ऑटोचालक भगवंतराय यांनी फोन पोलिसाकडे दिला. त्यावर कार्तिकने त्यांना मुख्यमंत्री शिवकुमार यांचे निवासस्थान व विधानसौधमधील त्यांच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहने जाताच बॉम्बचा स्फोट होईल, अशी धमकीही दिली.

फोनवरून मिळालेली धमकी ऐकून पोलिस हादरले. त्यांनी तातडीने वरिष्ठ पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर सदाशिवनगर पोलिसांनी तातडीने सुरू केला. ऑटोचालक भगवंतराय यांच्या मोबाईलवर आलेल्या फोन क्रमांकाचा माग काढून कार्तिकला अटक करण्यात आली आहे. दिसायला अत्यंत सभ्य वाटणारा कार्तिक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वीही त्याने अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या निवासस्थानांवर फोन करून बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या दिल्याचे समजते. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.