Karnataka Accident: टिप्‍परला दुचाकीची धडक; एक ठार

चडचण शहरातील सूर्य लॉजजवळ शुक्रवारी झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एका महिलेला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली
Accident
Accident
Published on
Updated on

विजापूर : जिल्ह्यातील चडचण शहरातील सूर्य लॉजजवळ शुक्रवारी झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एका महिलेला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली. या अपघातात धुमुकनाळ येथील दिलीप पाटील (वय ५५) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

त्यांच्यासमवेत दुचाकीवर प्रवास करणाऱ्या पत्नी ललिताबाई पाटील (वय ५०) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने विजापूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच चडचण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सोमेश गेज्जी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या घटनेची नोंद चडचण पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news