Karnataka 10th exam results: दहावी परीक्षा निकाल आज

दहावी परीक्षा-1 चा निकाल गुरुवारी (दि. 23) दुपारी 12 वाजता जाहीर केला जाईल, असे शालेय परीक्षा मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले आहे.
Karnataka 10th exam results: दहावी परीक्षा निकाल आज
Published on
Updated on

बेळगाव : राज्यात दि. 18 मार्च ते 2 एप्रिलदरम्यान दहावीची परीक्षा झाली होती. दहावी परीक्षा-1 चा निकाल गुरुवारी (दि. 23) दुपारी 12 वाजता जाहीर केला जाईल, असे शालेय परीक्षा मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील 8.50 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. शिक्षण खात्याने शुक्रवार (दि.24) रोजी निकाल देण्याचे जाहीर केले होते. मात्र, एक दिवस आधीच गुरुवारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तृतीय भाषेला ग्रेडऐवजी गुण देण्याचा आदेश न्यायालयाने जारी केला होता. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचे लक्ष निकालाकडे आहे.

https…//karresults.nic.in या वेबसाईटवर आणि कर्नाटक वन, मोबाईल ॲपद्वारे विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत क्रमांकावर निकाल पाहता येणार आहे. यंदा प्रथमच विद्यार्थ्यांची निकालाची गुणपत्रिका दुपारी 12 वाजता डिजिटलद्वारे उपलब्ध होईल. वेबसाईटवर गुणपत्रिका डाऊनलोड करता येणार आहे. निकालाची यादी संबंधित शाळांना दुपारी 12 वाजता उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे कर्नाटक शाळा आणि मूल्यमापन मंडळाने कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news