Karnataka Crime | बागलकोट हादरले : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला गळफास लावला; तडफडतानाचा केला व्हिडिओ शूट

कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील 'गलगली' गावातील अंगावर काटा आणणारा प्रकार
Bagalkot Murder Case
Bagalkot Murder CaseFile Photo
Published on
Updated on

Bagalkot Murder Case

काशीनाथ सुळकुडे

चिकोडी : एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटनेने कर्नाटकचे बागलकोट हादरून गेले आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका २३ वर्षांच्या विवाहितेची तिच्याच पतीने अमानुषपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, पत्नी गळफास घेऊन तडफडत असताना मदत करण्याऐवजी, पती तिची लाईव्ह व्हिडिओ शूटिंग करत होता, असा थरारक प्रकार उघडकीस आला आहे.

कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील 'गलगली' गावात हा अंगावर काटा आणणारा प्रकार घडला आहे. भाग्यश्री जिगलूर (वय २३ ) असे मृत महिलेचे नाव असून, प्रवीण जिगलूर असे संशयित आरोपी पतीचे नाव आहे.

Bagalkot Murder Case
Karnataka Crime: जेवणाच्या चवीवरून हत्याकांड

अमानुष अत्याचाराचा थरार:

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी प्रवीणने आधी लाकडी दांडक्याने पत्नी भाग्यश्रीला निर्दयपणे मारहाण केली. त्यानंतर तिला गळफास लावून मारण्याचा प्रयत्न केला. पत्नी गळफास लागलेल्या अवस्थेत वेदनेने तडफडत असताना, निर्दयी पतीने तिला वाचवण्याऐवजी मोबाईलवर तिचे थेट व्हिडिओ शूटिंग केले.

वाद अन् कपट कारस्थान:

गेल्या काही महिन्यांपासून या पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. या त्रासाला कंटाळून भाग्यश्री दोन महिन्यांपासून आपल्या पालकांकडे राहत होती. परंतु, आरोपी प्रवीणने "आपण पुन्हा नव्याने आणि शांततेने संसार करू" असे सांगून तिची समजूत काढली आणि तिला घरी परत आणले. मात्र, घरी आणलेल्या पहिल्याच दिवशी त्याने हा भयंकर कट रचून तिची हत्या केली.

Bagalkot Murder Case
Karnataka Crime: जेवणाच्या चवीवरून हत्याकांड

घटनेची माहिती मिळताच बिळगी पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी आरोपी पती प्रवीण जिगलूर याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news