DK Shivakumar : आशा वर्कर्सच्या मानधनात २,००० रुपयांची वाढ

१२ दिवसांचे आंदोलन स्थगित : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची घोषणा
DK Shivakumar
DK ShivakumarPudhari
Published on: 
Updated on: 

बंगळूर : मानधन वाढीच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून ठिय्या आंदोलन करणाऱ्या कर्नाटकमधील 'आशा' वर्कर्सनी शनिवारी आपले आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी राज्य सरकारच्या वतीने मानधनात दरमहा २,००० रुपयांची अतिरिक्त वाढ जाहीर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

विधानसौधपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या बेंगळुरूच्या फ्रीडम पार्क येथे या आशा वर्कर्स कडाक्याची थंडी आणि पावसाचा सामना करत आंदोलनाला बसल्या होत्या. शनिवारी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान 'कृष्णा' येथे आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली. या चर्चेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी मानधन वाढीची घोषणा केली.

युनियनने आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले असले, तरी काही आशा वर्कर्स या निर्णयावर समाधानी नाहीत. मानधन १५,००० रुपये करण्यात यावे, या मागणीवर त्या ठाम असून आंदोलनाबाबत अंतिम निर्णय अद्याप व्हायचा असल्याचे काहींनी सांगितले. आतापर्यंत आशा वर्कर्सना राज्याकडून ५,००० आणि केंद्राकडून २,००० असे एकूण ७,००० रुपये मिळत होते. आता जानेवारी २०२७ पासून त्यांना ९,००० रुपये मिळतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.