अंगणवाड्यांना लवकरच मिळणार एलकेजीचा दर्जा

अंगणवाड्यांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण मिळणार, उच्चस्तरीय बैठकीत निर्णय
Anganwadis will get LKG status
अंगणवाडी केंद्रांना पूर्व प्राथमिक शाळेचा दर्जा देण्याचा निर्णय file photo
Published on
Updated on

बंगळूर : राज्यातील अंगणवाडी केंद्रांना एलकेजी अर्थात पूर्व प्राथमिक शाळेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय लवकरच अंगणवाड्यांतील मुलांना गणवेश, पुस्तके आणि बॅग देण्यात येणार आहे. पत्रकारांशी बोलताना महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ही माहिती दिली. मुलांना आगामी काळात सरकारतर्फे गणवेश, पुस्तके, बॅग देण्यात येणार आहे. शाळांप्रमाणेच अंगणवाड्यांमध्ये ट्रान्स्फर सर्टिफिकेट (टीसी) दिले जाईल, असे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले.

प्राथमिक शाळेतच पूर्वप्राथमिक शिक्षण?

अंगणवाड्यांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाबाबत याआधीच अंगणवाडी शिक्षिकांशी चर्चा करण्यात आली आहे. सध्या सेवेत असणाऱ्या शिक्षिकांपैकी ९ हजारजणी पदवीधर आहेत. सुमारे दीड हजारजणींनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे दर्जेदार शिक्षण देण्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. कोणत्याही शिक्षिकेला सेवेतून मुक्त केले जाणार नाही, असेही हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले. गेल्याच आठवड्यात अंगणवाडी शिक्षिकांनी बंगळुरात बेमुदत आंदोलन छेडले होते. प्राथमिक शाळेतच पूर्वप्राथमिक शिक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्याला विरोध करून शिक्षिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर मंत्री हेब्बाळकर यांनी त्यांच्या मागणीचे समर्थन केले होते. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करून तातडीने बैठक बोलावण्याची विनंती केली होती.

Anganwadis will get LKG status
बेळगाव: सांबरा येथे २ हजार ६१४ अग्निवीर वायुसैनिकांनी घेतली देशसेवेची शपथ

अंगणवाड्यांचा दर्जा उंचावणार

कल्याण कर्नाटक भाग वगळून उर्वरित सर्व भागांमध्ये असणाऱ्या अंगणवाडी केंद्रांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याविषयी अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. दर्जेदार शिक्षण आणि पौष्टिक आहार देणे हा सरकारचा उद्देश आहे. त्याकरिता अंगणवाड्यांचा दर्जा उंचावण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news