Karnataka Accident: ट्रक-दुचाकीच्या धडकेत दोन युवक ठार; विजापुरात भीषण अपघात

पादचारी युवक जखमी
Karnataka Accident
Karnataka Accident
Published on
Updated on

विजापूर : शहराबाहेरील सोलापूर रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० वर ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील २ युवकांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत पादचारी युवक जखमी झाला आहे. भूषण नायक (वय २४) आणि गगन परमेश (वय १९) अशी मृतांची नावे आहेत.

अपघातात जखमी झालेल्या बिलाल जातगार यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रकचालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच रहदारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. फरार ट्रकचालकाचा शोध सुरू आहे. या घटनेची नोंद विजापूर वाहतूक पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news