Karnataka Accident : टँकरच्या धडकेत ट्रॅक्टर पुलावरून कोसळला: लहान मुलासह एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

सर्व मृत विजयनगर जिल्ह्यातील कुडलिगी तालुक्यातल्या मार्लायनाहळी येथील रहिवासी
6 killed in Karnataka accident
ट्रॅक्टरला टँकरने मागून धडक बसल्याने ट्रॅक्टर तुंगभद्रा नदीच्या पुलावरून खाली कोसळला. Pudhari
Published on
Updated on

6 killed in Karnataka accident

चिकोडी: ट्रॅक्टरला टँकरने मागून धडक बसल्याने ट्रॅक्टर तुंगभद्रा नदीच्या पुलावरून खाली कोसळला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना कर्नाटकातील कोप्पळ जिल्ह्यातील मुनीराबादजवळ घडली.

या घटनेत एका लहान मुलासह एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेत १० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना होसपेट आणि कोप्पळ येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्व मृत विजयनगर जिल्ह्यातील कुडलिगी तालुक्यातल्या मार्लायनाहळी येथील रहिवासी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news