Karnataka news: राज्यात पीओपीच्या १,२८३ गणेशमूर्ती जप्त

मंत्री रामलिंगा रेड्डी : विशेष मोहीम राबवून कारवाई
मंत्री रामलिंगा रेड्डी
मंत्री रामलिंगा रेड्डी
Published on
Updated on

बंगळूर : पर्यावरणाला हानीकारक असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींच्या निर्मिती व विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी विशेष कृती पथकांची स्थापना करण्यात आली असून, कारवाई सुरू करण्यात आली आहे. १८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान विशेष मोहीम राबवून एकूण १ हजार २८३ पीओपी गणेश मूर्ती जप्त करण्‍यात आल्याची माहिती वन व पर्यावरणमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी दिली आहे. ते रविवार दि. ६ रोजी पत्रकारांशी बोलत होते.

मंत्री रेड्डी यांनी कर्नाटकात पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी हा काही नवीन मुद्दा नाही; पण दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान पीओपी मूर्तींच्या निर्मिती व विक्रीबाबत प्रश्न उपस्थित होतात. पीओपी मूर्ती बंदीच्‍या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष पथके तयार करण्यात आली असून, पोलिस व विविध विभागांच्या सहकार्याने तपासणी करण्यात येत आहे.

गणेश चतुर्थीच्या उत्सवाला पर्यावरण संवर्धनाशी जोडून शाडूच्‍या मूर्तींचा वापर वाढवणे, हा एक दीर्घकालीन उपाय ठरू शकतो. पीओपीविरुद्धची कारवाई केवळ कायद्याची अंमलबजावणी म्हणून नव्हे, तर भावी पिढ्यांसाठी जलस्रोत, जलचर व पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या जबाबदारीचा एक भाग म्हणून पाहिली पाहिजे, असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news