Belgaum bribery case: कल्लोळी हेस्कॉमचा अभियंता मेटी लोकायुक्‍तांच्या जाळ्यात

विद्युत जोडणीसाठी २५ हजारांची लाच घेताना अटक
Bribery Case
Bribery Case Pudhari
Published on
Updated on

निपाणी: विद्युत कंत्राट घेतलेल्या विद्युत जोडणीच्या कामांशी संबंधित तीन ठिकाणांची पाहणी करून अंदाजपत्रक तयार करून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेताना मुडलगी तालुक्यातील कल्लोळी येथील हेस्कॉमच्‍या अभियंत्‍यांना बेळगाव येथील लोकायुक्त विभागाच्या पथकाने अटक केली. मारुती मेटी असे त्‍यांचे नाव आहे. शुक्रवारी ही कारवाई करण्‍यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मुडलगी तालुक्यातील तुक्कानट्टी गावचे रहिवासी हेस्कॉमचे क्लास वन कॉन्‍ट्रॅक्‍टर मलकाप्पा भीमाशंकर इंडी यांच्या नातेवाईक ती बागी आहेत. त्यामुळे इंडी यांनी बागी यांच्या कामाचे कंत्राट घेतलेल्या विद्युत जोडणीच्या कामांशी संबंधित तीन ठिकाणांची पाहणी करून तसे अंदाजपत्रक तयार करून दिले होते. दरम्यान, मारुती मेटी यांनी बागी यांच्याकडून या कामासाठी २५ हजार रुपयांची मागणी केली होती.

यासंदर्भात इंडी यांच्याकरवी बागी यांनी दि. २७ फेब्रुवारी रोजी कर्नाटक लोकायुक्त पोलिस ठाणे, बेळगाव येथे तक्रार दिली होती. त्यानुसार याची खातरजमा करून लोकायुक्त विभागाचे जिल्हा पोलिस प्रमुख प्रसन्न देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली डीएसपी बी. एस. पाटील, भरत रेडी यांच्या नेतृत्वाखाली सीपीआय संगमेश होसमनी, गुरुराज मैलार, गोविंदगौडा पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मारुती मेटी यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून रकमेसह अटक केली आहे.​

मेटी यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याची माहिती डीएसपी बी. एस. पाटील यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news