

बेळगाव : ऐनापूर- कुडची रेल्वे पुला दरम्यान जुगार खेळणाऱ्या ठिकाणी कागवाड पोलिसांनी शनिवार दि. २ रोजी छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी ५ जणांना अटक करून त्यांच्याकडून रोख ३ हजार ६०० रुपये आणि ४ दुचाकी आणि मोबाईल असा एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
झाकीरहुसेन अल्लाउद्दीन रूकुडी (वय ४२), महिमउद्दीन साहेबलाल पिनीतोड (वय २८), तौसिफ रुक्मुद्दीन करीमखान(वय ३२), राजू गोपाळ गस्ती (वय ४३), झाकीरहुसेन अब्बासअली सांदारवाले ( वय ४२, सर्व रा. कुडची) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कुडचीजवळील रेल्वे पुलाजवळ जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार डीवायएसपी प्रशांत मुन्नोळी, अथणी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संतोष हळ्ळूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आर. एस. खोत, उपनिरीक्षक कुमार देसाई यांनी छापा टाकून ही कारवाई केली.