Jamkhandi crime : खून करून मृतदेहासह कार पेटविली

जमखंडी तालुक्यातील घटना : पूर्ववैमनस्यातून कृत्य, तिघे ताब्यात
Jamkhandi crime
Jamkhandi crimePudhari
Published on
Updated on

जमखंडी : जमखंडी तालुक्यातील कन्नोळी गावात भररस्त्यात एका व्यक्तीचा निर्घृण खून करून मृतदेह व कार पेटवून देण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री घडली. सोमू उर्फ सोमलिंग पडसलगी (वय 36) असे मृताचे नाव असून तो शेतकरी करत होता, असे समजते. कुटुंबियांंमधील जुन्या वैमनस्याचे पर्यवसान भीषण खुनात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार संशयित सदाशिव पडसलगी हा सोमलिंग याचा चुलत भाऊ असून त्यांच्यात जुने वैर होते. सोमलिंग सोमवारी संध्याकाळी नवीन कार खरेदी करून रात्री घरी परतत होता. यावेळी सदाशिव पडसलगी दोन साथीदारांसह कनोळ्ळी गावाच्या मुख्य रस्त्याजवळ थांबला होता. सोमलिंग त्या ठिकाणी पोहोचला तेव्हा त्यांच्यात वाद झाला. तो कारमधून खाली उतरताच त्या तिघांनी त्याच्यावर चाकूने वार केले. यात सोमलिंगचा मृत्यू झाला. त्यानंतर संशयितांनी गाडीतील पेट्रोल ओतून कार आणि मृतदेह जाळला.

बागलकोट जिल्हा पोलिस प्रमुख सिद्धार्थ गोयल, जमखंडी डीवायएसपी सय्यद रोशन जमीर, सीपीआय मल्लप्पा मड्डी, सावळगी पीएसआय अप्पू ऐगळी, जमखंडी पीएसआय अनिल कुंबार आदींनी घटनास्थळी भेट दिली. सावळगी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान संशयित सदाशिव पडसलगी, रवी पाटील आणि नवी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच खुनासाठी वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news