कर्नाटकात आज बागलकोट व दावणगिरी मतदारसंघाची पोटनिवडणूक

Karnataka Assembly Byelections 2026 | सत्ताधारी काँग्रेस व भाजपची प्रतिष्ठापणाला, सकाळपासूनच मतदानाला सुरुवात
Assembly Elections Focus |
Assembly Elections Focus | वेध पाच राज्यांच्या निवडणुकांचा
Published on
Updated on

काशिनाथ सुळकुडे

चिकोडी : कर्नाटकातील दावणगिरी दक्षिण व बागलकोट या दोन विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक सुरू असून त्यासाठी आज मतदान होत आहे. दावणगिरीचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्यामनूर शिवशंकरप्पा व माजी मंत्री, बागलकोट चे आमदार एच वाय मेटी यांच्या निधनामुळे रिक्त असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या जागांवर पोटनिवडणूक होत आहे.

सत्ताधारी काँग्रेस व भाजप यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होत आहे. विशेष म्हणजे दोन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेसने कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली आहे. दावणगिरी दक्षिण येथून दिवंगत श्यामनूर शिवशंकरप्पा यांचे नातू, कर्नाटकाचे मंत्री एस मल्लिकार्जुन यांचे सुपुत्र समर्थ श्यामनुरप्पा हे काँग्रेसकडून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे श्रीनिवास टी यांच्यासह एकूण 9 उमेदवार रिंगणात आहेत.

बागलकोट मतदारसंघात माजी मंत्री एच वाय मेट्टी यांचे सुपुत्र उमेश मेटे यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली असून त्यांच्या विरुद्ध भाजपचे माजी आमदार वीरण्णा चरंतीमठ यांच्यासह एकूण 25 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

या दोन्ही मतदारसंघात स्वतः मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार सभा घेतल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांच्यासह इतर नेत्यांनी देखील घराणेशाहीला विरोध व राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध प्रचार तंत्र वापरून भाजपचे उमेदवार आणण्यासाठी जोर लावला आहे. त्यामुळे कर्नाटकातील या दोन मतदारसंघातील पोटनिवडणूक सत्ताधारी काँग्रेस व विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला प्रतिष्ठापनाची ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news