Almatti Dam : अलमट्टी धरणात पाण्याची आवक वाढली, विसर्ग सुरू

धरणात ९३. ८१० टीएमसी पाणीसाठा
Almatti Dam water discharge
अलमट्टी धरणात सध्या १ लाख ४३ हजार ७५० क्युसेक पाणी येत आहे. Pudhari News Network

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : अलमट्टी जलाशयात पाण्याची आवक वाढली असून सध्या १ लाख ४३ हजार ७५० क्युसेक पाणी येत आहे. तर धरणातून १ लाख ४२ हजार ९५ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

जलाशयात आता ५१७. ७२ मीटर म्हणजेच ९३. ८१० टीएमसी पाणीसाठा आहे. दोन दिवसांपासून जलाशयात पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे विसर्गातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news