Karnataka Crime: मुलीनेच केला वडिलांचा खून

इंडी येथील खुनाचा उलगडा, मालमत्ता, प्रेमसंबंधाला विरोध केल्‍याने कृत्‍य
Karnataka Crime
संशयित प्रियांका, संतोष शिंदे
Published on
Updated on

विजापूर : विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील चौडीहाळ रस्त्यावरील पुजारी वस्ती परिसरात निवृत्त शिक्षक सिद्धप्पा अंजुटगी (वय ६२) यांचा खून करण्‍यात आला होता. या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले असून मालमत्तेचा वाद आणि प्रेमसंबंधाला विरोध केल्याच्या कारणातून मुलीनेच प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने वडिलांचा खून केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.

चौडीहाळ रस्त्यालगत सिद्धप्पा यांचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला अज्ञातांनी त्यांचा खून करून मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, सिद्धप्पा यांची मोठी मुलगी निकिता हिने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान सिद्धप्पा यांची मुलगी प्रियांका हिचाच या खुनात सहभाग असल्याचे समोर आले. पोलिसांनी प्रियांका आणि तिचा प्रियकर संतोष शिंदे याला अटक केली असून त्यांचा साथीदार गुरुराज बिरादार हा फरार आहे.

सिद्धप्पा दोन वर्षांपूर्वी शिक्षक पदावरून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम तसेच गावातील मालमत्तेवरून त्यांचा मुलगी प्रियांकासोबत वाद सुरू होता. दरम्यान, प्रियांकाच्या पतीचा कोरोनाकाळात मृत्यू झाला होता. त्यानंतर विजापूर येथे वास्तव्यास असताना तिची रिक्षाचालक संतोष शिंदे याच्याशी ओळख झाली. पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. या संबंधाला सिद्धप्पा यांनी विरोध केला होता. तसेच मालमत्तेत वाटा देण्यासही त्यांनी नकार दिल्याने प्रियांका नाराज होती.

१५ रोजी मालमत्तेच्या कारणावरून प्रियांका आणि सिद्धप्पा यांच्यात वाद झाला. त्यानंतर प्रियांकाने संतोषला घरी बोलावले. रात्री संतोष मित्र गुरुराजसह तेथे आला. दोघांनी प्रथम सिद्धप्प यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर डोक्‍यात दगड घालून खून केल्याचा पोलिसांचा संशय आहे. प्रियांका आणि संतोष यांना अटक करण्यात आली असून फरार गुरुराज बिरादार पोलिस शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news