

बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात प्रशिक्षण घेऊन कौशल्यावर आधारित नोकरीच्या संधी उपलब्ध करून देता येतील. जिल्ह्यातील बड्या उद्योजकांची बैठक घेऊन मागण्यांची यादी तयार करावी, अशा सूचना कर्नाटक कौशल्य विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. ई. व्ही. रामनरेड्डी यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. 14) कर्नाटक कौशल्य विकास प्राधिकरणाच्या जिल्हा कौशल्य समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आणि प्रत्येकाला सक्षम बनवण्यासाठी कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर कौशल्य समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकार 2014 पासून कौशल्य विकासाशी संबंधित योजना सुरू केल्या आहेत. कौशल्य विकास प्रकल्प अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कर्नाटक कौशल्य विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे आता हे काम गतीने होणे अपेक्षित आहे, असे डॉ. रामनरेड्डी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, सर्व क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी संसाधन व्यक्ती नियुक्त केल्या पाहिजेत. विविध कंपन्यांमध्ये भरपूर नोकर्या आहेत. उमेदवारांनी त्यांच्या मागणीनुसार प्रशिक्षण घेतले पाहिजेत. त्यासाठी येत्या काही दिवसांत विविध कंपन्यांच्या एचआर यांची बैठक बोलावून माहिती घेऊन त्याचा अहवाल तयार करावा.
फलोत्पादन विभागाचे उपसंचालक महांतेश मुरगोंड यांनी, जांबोटी येथे मधमाशीपालन वाढले असून, उद्यान विभागामार्फत मधमाशी पालनाचे प्रशिक्षण दिले जात आहे, असे सांगितले. कर्नाटक कौशल्य विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक नवाज यांनी प्रशिक्षणासंबंधी माहिती दिली. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी दिनेशकुमार मीना, जिल्हा नगर विकास कक्ष संचालक मल्लिकार्जुन कलादगी, जिल्हा उद्योग विभागाचे सहसंचालक सुरेश पै, जिल्हा पंचायत नियोजन संचालक रवी बंगारप्पनवर आदी उपस्थित होते.
बोगद्यातील पाईपमध्ये अजिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी उद्योग खात्याच्या अधिकार्यांना उत्पादन, अकाऊंट व विक्री क्षेत्रातील सर्व औद्योगिक कंपन्यांना भेटी देऊन आवश्यक माहिती गोळा करावी, अशा सूचना दिल्या.