Vijapur Accident: दुचाकी-ट्रक अपघातात शिक्षक दाम्‍पत्‍य ठार

दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी विजापूर शहराजवळील तोरवी परिसरात घडली
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

विजापूर : दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी विजापूर शहराजवळील तोरवी परिसरात घडली. विजापूर तालुक्यातील खतिजापूर एच. पी. एस. शाळेतील शिक्षिका अंबिका पुजारी (वय ३४) आणि विजापूर येथील चाणक्य करिअर अकॅडमीचे शिक्षक गुरुलिंग हुनश्याळ (३७) अशी मृत दाम्‍पत्‍याची नावे आहेत.

दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, भरधाव ट्रकमुळे हा अपघात झाल्‍याचा पोलिसांचा संशय आहे. या घटनेची माहिती मिळताच विजापूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्‍यांनी पंचनामा करून तपास सुरू केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात तसेच परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news