

हुक्केरी : पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे हुकेरी तालुक्यातील घटप्रभा, हिरण्यकेशी व मार्कंडेय नद्यांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. शिरुर धरणातून 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.
मार्कंडेय नदीवर उभारण्यात आलेल्या धरणाच्या 4 दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती सहाय्यक कार्यकारी अभियंता प्रवीण आरळीकट्टी यांनी दिली.
धरणाचा पाणी साठ्याची क्षमता 3696 टीएमसी आहे. सध्या धरणात 2223 टीएमसी पाणी आहे. धरणानजीक असलेल्या बगरनाळ, शिरूर, बस्सापूर, नदीगुडके, करगुप्पी, धोडगेरी या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.