

बेळगाव : हिंडलगा कारागृहात शनिवारी पुन्हा छापा टाकून झडती घेण्यात आली. विशेषतः कुख्यात गुंड जयेश पुजारीसह अन्य काही गुंडांच्या बराकीची झडती घेण्यात आली. परंतु, यामध्ये काहीही आढळून आले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
शुक्रवारी व शनिवारी सलग दोन दिवस वडगाव पोलिसांनी हिंडलगा कारागृहात जाऊन पाहणी केली. यापूर्वी सापडलेले मोबाईल व त्याबाबतच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी शुक्रवारी एक पथक गेले होते. यानंतर शनिवारी वडगावचे पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमणीगौडर हे सहकाऱ्यांसह पुन्हा गेले होते.
अनेक प्रकरणांत आत असलेला गुंड जयेश पुजारी याच्यासह अन्य काही जणांच्या बराकीची पाहणी केली. जयेशच्या बराकीत मोबाईल अथवा अन्य काही आक्षेपार्ह सापडले असण्याची शक्यता आहे. परंतु, पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.