हिंडलगा जेलमध्ये कैद्यांमध्ये हाणामारी, एकावर विटेने हल्ला

हिंडलगा जेलमध्ये कैद्यांमध्ये हाणामारी, एकावर विटेने हल्ला
Belagavi news
हिंडलगा जेलमध्ये कैद्यांमध्ये हाणामारी, एकावर विटेने हल्लाfile photo
Published on
Updated on

बेळगाव : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या दोघा कैद्यांमध्ये वादावादी होऊन हाणामारी झाली. सोमवार (दि. ८) सायंकाळी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात ही घटना घडली असून एका कैद्याने दुसऱ्या कैद्यावर विटेने हल्ला केल्याने एकजण जखमी झाला आहे. सदानंद ऊर्फ पापू सुभाषराव (वय ५१, मूळ रा. मल्लिकार्जुन गल्ली, बसव कल्याण जि. बिदर) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयातील कैदी वॉर्डात उपचार सुरू असून याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिस स्थानकात जेलर राजेश धर्मट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंकराप्पा तिप्पण्णा कोरवर उर्फ बजंत्री (रा. धारवाड) या कैद्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

Belagavi news
अमरावती कारागृहात दोन कैद्यांमध्ये हाणामारी

हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात वरील दोघेजण जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. सोमवारी सायंकाळी अचानक दोघांमध्ये वादावादी झाली. यावेळी शंकराप्पाने सदानंदला विटेने मारहाण केल्याने तो जखमी झाला. या घटनेमुळे कारागृहात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी जेलर राजेश धर्मट्टी यांनी बेळगाव ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news