

बेळगाव (पुढारी वृत्तसेवा) : तालुक्यातील बेनकनहळ्ळी येथे १ लाख ६० हजार रूपये किंमतीचे हेरॉईन जप्त करून एकावर गुन्हा दाखल केला. शनिवारी सायंकाळी वडगाव पोलिसांनी ही कारवाई केली.
सदर तरुण बेनकनहळ्ळी परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी आल्याची माहिती वडगाव पोलिसांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह जाऊन सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे ७ ग्रॅमहून अधिक हेरॉईन असल्याचे आढळून आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे त्याचे नाव समजू शकले नाही.