

बेळगाव : मध्यवर्ती बस स्थानकाजवळ हेरॉईन विक्री करणार्या दोघांना मार्केट पोलिसांनी रविवारी (दि. 22) अटक केली. त्यांच्याकडून 40 हजार रुपये किमतीचे हेरॉईन आणि दुचाकी जप्त करण्यात आली. युनूस दस्तगीरसाब सनदी (वय 45, रा. निजामउद्दीन गल्ली, न्यू गांधीनगर) आणि मुशरेब जरारअहमद पटेल (वय 27, रा. न्यूवीरभद्रनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
दोघेजण अमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती मार्केट पोलिसांना मिळाली. त्यानंतर मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला.
पोलिसांनी या दोघांकडून 48.22 ग्रॅम हेरॉईन जप्त केले. तसेच एक दुचाकी जप्त करुन या दोघांवर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.