Police Commissioner Transfer Issue | पोलिस आयुक्तांच्या बदली रद्दसाठी वाढता दबाव

बदलीला तात्पुरता ब्रेक? : सर्वभाषिक बेळगावकर आयुक्तांच्या पाठीशी
Police Commissioner Transfer Issue |
Police Commissioner Transfer Issue | पोलिस आयुक्तांच्या बदली रद्दसाठी वाढता दबाव
Published on
Updated on

बेळगाव : पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांची हुबळी-धारवाडला बदली झाल्याचा आदेश शनिवारी (दि. २९) दाखल झाला होता. परंतु, त्यांची बदली करु नये, यासाठी बेळगावातील विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्यांतून दबाव वाढत चालला आहे. सोमवारी (दि. ३१) कन्नड रक्षण वेदिकेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची बदली रद्द व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

बदलीचा आदेश आल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (दि. ३०) पोलिस आयुक्त बोरसे सुत्रे नूतन आयुक्तांकडे सुत्रे देणार होते. तसा संदेश आयुक्तालयाच्या ग्रुपवर शनिवारी सायंकाळी पडला. परंतु, पुन्हा काही घडामोडी घडून हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचा दुसरा संदेश पडला. त्यामुळे त्यांच्या बदलीला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना व बेळगावचा उत्सव संवेदनशील असल्याने त्यांची बदली होऊ नये, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. रविवारी काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या बदलीला विरोध करत पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांची भेट घेतली.

गेल्या सव्वा वर्षांपासून आयुक्त बोरसे यांनी बेळगावसाठी उत्तम काम करुन दाखवले आहे. त्यांनी भाषाभेद, जातीभेद न करता प्रत्येकाला न्याय देण्याचे काम केल्याची भावना जनतेत आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी कन्नड, मराठी भाषिकांसह सर्व समाजाचे लोक असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी करवेने मोर्चा काढून त्यांची बदली रद्द करावी अन्यथा आम्ही बंगळुरात जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news