Gokak waterfall: निसर्गाचे अद्भूत रूप! बेळगावचा प्रसिद्ध 'गोकाक धबधबा' प्रवाहित; पर्यटकांची गर्दी वाढली

मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला 'गोकाक धबधबा' पुन्हा एकदा पूर्ण वेगाने प्रवाहित झाला आहे.
Gokak waterfall
Gokak waterfallpudhari photo
Published on
Updated on

Gokak waterfall

चिकोडी : काशिनाथ सुळकुडे

गेल्या काही दिवसांपासून घटप्रभा नदीच्या पाणलोट क्षेत्रात आणि पश्चिम घाटात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला 'गोकाक धबधबा' प्रवाहित झाला आहे. धबधब्याचे हे विहंगम आणि अद्भूत रूप पाहण्यासाठी आता पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

'भारताचा नायागरा' पुन्हा गर्जला

आपल्या अथांग विस्तारामुळे आणि उंचावरून कोसळणाऱ्या पाण्याच्या रौद्र रूपामुळे गोकाक धबधब्याला 'भारताचा नायागरा' म्हणून ओळखले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी कमी झाल्यामुळे हा धबधबा कोरडा पडला होता. मात्र, जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला मान्सूनने दमदार हजेरी लावल्यामुळे घटप्रभा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, गोकाक येथील खडकाळ कड्यावरून पांढरे शुभ्र पाणी प्रचंड गर्जना करत खाली कोसळताना दिसत आहे.

Gokak waterfall
Monsoon Update | राज्‍यात पावसाचा जोर; सोमवारपर्यंत मुसळधार

पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण

धबधबा प्रवाहित झाल्याचे समजताच बेळगाव, कोल्हापूर, सांगली आणि गोव्यातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. धबधब्यावरून असणारा प्रसिद्ध लटकता पूल आणि आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पर्यटकांना आकर्षित करत आहे. कोसळणाऱ्या पाण्याच्या तुषारांमुळे संपूर्ण परिसरात थंडगार वातावरण निर्माण झाले आहे.

प्रशासनाकडून सुरक्षेचे आवाहन

धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. पावसाळ्यात दगडांवर शेवाळ साचून घसरगुंडी होण्याची शक्यता असते, तसेच पाण्याचा वेगही जास्त असतो. त्यामुळे पर्यटकांनी धबधब्याच्या मुख्य पात्रात किंवा धोकादायक ठिकाणी उतरू नये, सेल्फी काढताना सुरक्षित अंतर ठेवावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Gokak waterfall
Mumbai Goa highway traffic update : मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news