Adani Meets D.K. Shivakumar | अदानींनी घेतली मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट

बंगळूर टनेल रोड प्रकल्पाच्या कंत्राटांसंदर्भात चर्चा झाल्‍याची माहिती
Adani Meets D.K. Shivakumar |
Adani Meets D.K. Shivakumar | अदानींनी घेतली मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट
Published on
Updated on

बंगळूर : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी एका महत्त्वपूर्ण घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची रविवार दि. २३ रोजी भेट घेऊन चर्चा केली आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीमुळे राज्यात चर्चेचा विषय बनला आहे.

राज्यातील व्यावसायिक संधी व बहुप्रतीक्षित बंगळूर टनेल रोड प्रकल्पाच्या कंत्राटांच्या वाटपासंदर्भात दोघांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली असल्याचे कळते. बंगळूरमधील वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने सरकार हेब्बाळ ते सिल्क बोर्डपर्यंत १७ कि.मी. लांबीचा बोगदा बांधण्याची योजना आखत आहे. या प्रकल्पासाठी सरकारने १७ हजार ६९८ कोटी रुपये अंदाजे खर्च निश्चित केला आहे. मात्र, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने २२ हजार २६७ कोटी रुपयांची निविदा भरली आहे. ही रक्कम सरकारच्या अंदाजापेक्षा ४ हजार ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निविदेत सहभागी झालेल्या इतर कंपन्यांच्या बोलींच्या तुलनेत अदानीची बोलींची रक्कम कमी आहे. निविदा अंतिम करण्यापूर्वी अदानी यांनी बोगदा बांधण्यात येणाऱ्या ठिकाणी प्रमुख तांत्रिक चाचण्यांसह आवश्यक प्राथमिक भू-सर्वेक्षण व माती गुणवत्ता चाचणी पूर्ण केली आहे. अदानी यांनी कंत्राटाचा प्रस्ताव सरकारकडे आधीच सादर केला असून, कामाचा ताबा अधिकृतपणे घेण्यासाठी चर्चा सुरू आहे. सध्या प्रकल्पाच्या खर्चवाढीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणे बाकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news