

उड्डाण पूल, नूतन जिल्हाधिकारी कार्यालय आणि पत्रकार भवनाच्या नवीन इमारत कामाचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते सप्टेंबर महिन्यात करण्यात येणार आहे, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. मंत्री जारकीहोळी म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी 55 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. पत्रकार भवनाच्या नूतन इमारतीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून 10 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
*एकूण अंतर 4.5 किलोमीटर
*चौपदरी, दोन जाण्यासाठी तर दोन येण्यासाठी
*अशोक सर्कल येथे तीन वळणे जोडणार
*आरटीओ सर्कल येथे तीन मार्गाने जोडणार
*कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे चार मार्गांना जोडणार
*जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पार्किंग झोन
सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या मंदिराच्या विकासासाठी तसेच संपूर्ण तालुक्याचे विकासासाठी 215 कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून सरकारच्या प्रशासकीय विभागाने त्याला मान्यता दिली आहे. मंत्री एच. के. पाटील यांनी या परिसराच्या विकासाकडे अधिक लक्ष दिले आहे. त्यामुळे लवकरच या कामालाही सुरुवात होणार असून निविदा प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. क्रीडांगणासाठी 10 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामधून सुसज्ज क्रीडांगण उभारण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.