बेळगाव : रेल्वेउड्डाणपुलाच्या पलीकडे मालगाडीचे घसरलेले डबे बाजूला करण्यासाठी प्रयत्न करताना कर्मचारी.pudhari photo
बेळगाव
घसरले मालगाडीचे डबे अन् 9 रेल्वेगाड्यांचे वेळापत्रकही
Malgadi derailment: टिळकवाडीत पहाटे अपघात, जीवितहानी नाही
बेळगाव : रेल्वेमालगाडीचे डबे घसरण्याच्या घटना दुधसागरजवळ घडतात. मात्र मंगळवारी रोजी सकाळी 7.30 वाजता बेळगावात मुख्य रेल्वे उड्डाणपुलाच्या पलीकडे मालवाहू रेल्वेगाडीचे डबे घसरल्याची घटना घडली.
या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी डबे घसरल्याने इतर 9 रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल करावा लागला. बेळगावातून धावणार्या लोंढा-मिरज पॅसेंजर, म्हैसूर-बेळगाव, बंगळूर-सांगली, बंगळूर - जोधपूर, तिरुपती - हुबळी, अजमेर - बंगळूर, मिरज - कुडची, दादर - पांड्येचेरी, दादर - हुबळी या रेल्वेच्या वेळेत बदल करावा लागला. दहा वाजता डबे बाजूला केल्यांतर सकाळी 11 नंतर या मार्गावर या रेल्वे धावल्या. रेल्वेरुळावरुन घसरलेले दोन डबे रेल्वे रुळाच्या शेजारी बाजूला ठेवण्यात आले आहेत.

