Former Karnataka DGP murdered
माजी पोलिस महासंचालक ओम प्रकाश(Image Source ANI)

कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक ओम प्रकाश यांची हत्‍या

Former Karnataka DGP murdered | मालमत्तेच्या वादातून पत्‍नीनेच हत्‍या केल्‍याचा संशय
Published on

बंगलोर : कर्नाटकचे निवृत्त पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. त्यांची पत्नी पल्लवी यांनीच मालमत्तेच्या वादातून ही हत्या केल्याचा संशय आहे. बंगलोर येथे ते राहत असलेल्‍या घरीच ही घटना घडली आहे. ओमप्रकाश मुळचे बिहारचे असून १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ते सध्या ६८ वर्षांचे होते.

ओमप्रकाश हे मुळचे बिहारमधील चंपारणमधील होते. १ मार्च २०१५ मध्ये त्‍यांची कर्नाटक राज्‍याचे पोलिस महासंचालक म्‍हणून नियुक्‍ती झाली होती. यापूर्वी ते फायर ब्रिगेडचे महानिर्देशक होते. तसेच. ओम प्रकाश यांनी 2004 मध्ये बेळगाव उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.

याबाबत पोलिंसाकडून मिळालेली माहितीनुसार हा खून संपत्‍तीच्या वादातून झाला असल्‍याचा संशय आहे. बंगलोरमधील राहत्या घरी रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास चाकूने भोसकून ही हत्या केल्यानंतर त्‍यांची पत्‍नी पल्लवी यांनी आपल्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून मृतदेह दाखवत,'मी या राक्षसाला संपवलं' असं म्हटल्याचेही स्पष्ट होत आहे. दांडेली येथील मालमत्तेवरून उभय पती-पत्नीमध्ये वाद होत असत, अशीही माहिती उघड होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news