पाच लाख जप्त; बारा जुगारी अटकेत

हिरेबागेवाडीजवळ छापा ः ‘सीसीबी’ पथकाची कारवाई
Belgaon News
बेळगाव ः जुगार्‍यांकडून जप्त केलेली पाच लाखांची रक्कम.Pudhari Photo
Published on
Updated on

बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा

जुगार खेळणार्‍या 12 जणांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल 4 लाख 81 हजार रूपये जप्त करण्यात आले मंगळवारी रात्री ‘सीसीबी’च्या पथकाने ही कारवाई केली. हिरेबागेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुत्नाळ गावाहून टोल नाक्याकडे जाणार्‍या सर्व्हिस रस्त्यावर जुगार सुरू असल्याची माहिती सीसीबीचे निरीक्षक नंदीश्वर कुंभार व त्यांच्या सहकार्‍यांना मिळाली. कुंभार यांनी सोबत हेड कॉन्स्टेबल जी. आर. शिरसंगी, एस. बी. पाटील, एम. एम. वडेयर, पोलिस ए. एन. रामगोनट्टी, एम. एस. पाटील यांना सोबत घेऊन येथे छापा टाकला. यावेळी 12 जण सापडले. त्यांच्याकडून 4 लाख 81 हजाराची रक्कम जप्त करून हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

अटक केलेले संशयित असे ः शहबाद खीरसाब तिगडी, रियाज हुसेनसाब पटेल (दोघेही रा. हिरेबागेवाडी), स्वप्नेश तवनाप्पा बेन्नाडी (जैन गल्ली, गोकाक), इराप्पा बसाप्पा मदनळ्ळी (रा. इंचल गल्ली, ता. बैलहोंगल), प्रकाश रायाप्पा नायकर (करीमनी, ता. बैलहोंगल), यल्लाप्पा बाळप्पा अरेन्नवर (आदीजांबवनगर, गोकाक), इराप्पा यल्लाप्पा नायकर (सोमनट्टी, ता. बैलहोंगल), लिंगनगौडा शिनवनगौडा पाटील (रा. देवलापूर, ता. बैलहोंगल), मलिकजान रसूलसाब उस्ताद (सुभाषनगर, हिरेबागेवाडी), चेतन मारुती चंदगडकर (पेठ गल्ली, सांबरा), यल्लाप्पा हणमेत जट्टीण्णवर (देवलापूर, ता. बैलहोंगल) व मल्लिकार्जुन चन्नमल्लाप्पा होटी (श्रीरामनगर, बैलहोंगल).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news