

हुबळी : कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात पाचजण जागीच ठार झाल्याची घटना हुबळी तालुक्यातील कुसुगल गावाजवळ इंगळहळ्ळी क्रॉसवर मंगळवारी (दि. 6) घडली. श्वेता (वय 29), अंजली (वय 26), संदीप (वय 26), विठ्ठल (वय 55) आणि शशिकला (वय 40) अशी मृतांची नावे आहेत.
विजापूरहून हुबळीकडे येणार्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणार्या ट्रकला जोरात धडक बसली. या घटनेत कारचा चेंदामेंदा झाला आहे. सर्व मृत शिमोगा जिल्ह्यातील सागरमधील सर्व रहिवासी आहेत. सर्वजण हॉटेल व्यवसायासाठी बागलकोटला गेले होते.
काम आटोपून हुबळीमार्गे शिमोगा येथून परतत असताना हा अपघात झाला. हुबळी ग्रामीण पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.