Belgaum crime: बेळगावातून पाच सराईत हद्दपार

बेळगाव, हलगा, मच्छेतील गुन्हेगारांवर कारवाई
हद्दपार / तडीपार
हद्दपार / तडीपार
Published on
Updated on

बेळगाव : अमली पदार्थ विक्री, खून तसेच खुनी हल्ल्यासह अन्य प्रकरणांमध्ये अनेक गुन्हे दाखल झालेल्या पाच जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी शनिवारी हा आदेश बजावला.

पाचपैकी चौघांना सहा महिन्यांसाठी तर एकाला तीन महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केल्याचे आदेशात नमूद आहे. 10 एप्रिलपासून आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.पिराजी यल्लाप्पा येसुचे (रा. गणपती गल्ली, हलगा), यश गणेश दावले ऊर्फ गवळी (रा. गवळी गल्ली, मंगळवार पेठ, टिळकवाडी) आदित्य गणेश दावले ऊर्फ गवळी (रा. गवळी गल्ली, मंगळवार पेठ, टिळकवाडी), संतोष ऊर्फ आरमोग गोविंद दिवटगी (रा. पार्वतीनगर, बेळगाव) व रफिक ऊर्फ महंमदरफिक इस्तियाक शेख (रा. मच्छे, ता. बेळगाव) यांचा समावेश आहे.

पिराजीवर वडगाव पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विक्रीचे चार गुन्हे दाखल आहेत. यशवर टिळकवाडी पोलिसांत दोन खुनी हल्ले व खून प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे. आदित्यवरही टिळकवाडी ठाण्यात 2 खुनी हल्ले व खून प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे. संतोषविरोधात पाच खुनी हल्ले व खून प्रकरणाचा गुन्हा उद्यमबाग पोलिसांत दाखल आहे. या सर्वांची 10 एप्रिलपासून 9 ऑक्टोबर 2026 पर्यंत सहा महिन्यांसाठी हद्दपारी केली आहे.

रफिकवर तीन दरोड्याचे प्रयत्न, खुनी हल्ला व बालअत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत गुन्हा वडगाव पोलिसांत दाखल आहे. त्याला 10 एप्रिलपासून 9 जुलै 2026 पर्यंत तीन महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news