Ganja smuggling: पाच गांजा तस्करांना अटक

11 कोटींचा गांजा जप्त
Ganja smuggling: पाच गांजा तस्करांना अटक
pudhari photo
Published on
Updated on

बंगळूर : बंगळूर शहर पोलिसांनी छापे टाकून परराज्यातील एका संशयितासह पाच अमली पदार्थ तस्करांना अटक केली असून, एकूण 11.4 कोटी रुपये किमतीचा गांजा, एमडीएमए आणि एक वाहन जप्त केले आहे. मंगळवारी दिवसभरात ही कारवाई करण्यात आली. म्हैसूर रोडवरील नयनदहळ्ळी सिग्नलजवळ गांजाची वाहतूक करणाऱ्या ड्रग डीलरवर छापा टाकून 3.32 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले.

उप्पारपेटे पोलिस ठाण्याने आर. के. पुरम येथील एका लॉजवर छापा टाकून 7.60 कोटी रुपये किमतीचा 3 किलो 900 ग्रॅम गांजा जप्त केला. त्याचप्रमाणे कडुगोडी पोलिस ठाण्याने चन्नसंद्रा मुख्य रस्त्यावर कारवाई करून 12 लाख रुपये किमतीचा गांजा आणि एमडीएमए जप्त करण्यात यश मिळवले. सीसीबी पोलिसांनी 3.32 कोटी रुपये किमतीचा 332 किलो गांजा, एक मालवाहू वाहन आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात यश मिळवले आहे.

उप्पारपेटे पोलिसांनी 7.60 कोटी रुपये किमतीचे 3 किलो एमडीएमए जप्त केले आणि काडुगोडी पोलिसांनी 12 लाख रुपये किमतीचे 12 ग्रॅम एमडीएमए आणि 11 किलो गांजा जप्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news