Minor driving: अल्पवयीन मुलास दुचाकी दिल्याबद्दल 25 हजार दंड

न्यायालयाने दुचाकी मालकास (पालक) दोषी धरून 25 हजार रुपये दंड व एक दिवसाची साधी कैद अशी शिक्षा देत एक वर्षासाठी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश दिला
Minor driver
Minor drivingPudhari
Published on
Updated on

निपाणी : अल्पवयीन मुलाला दुचाकी चालविण्यास दिल्याबद्दल निपाणी जेएमएफसी न्यायालयाने दुचाकी मालकास (पालक) दोषी धरून 25 हजार रुपये दंड व एक दिवसाची साधी कैद अशी शिक्षा देत एक वर्षासाठी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश दिला. चंद्रकांत गालाप्पा (रा.चिंचोळी, जि. गुलबर्गा) असे शिक्षा झालेल्याचे दुचाकी मालकाचे नाव आहे. हे प्रकरण ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत उघडकीस आले.

दि.10 रोजी राष्ट्रीय महामार्गावर ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपरीक्षक शिवराज नाईकवडी सहकाऱ्यांसमवेत महामार्गावर आप्पाचीवाडी फाटा येथे वाहनांची तपासणी करत होते. यावेळी गवंडी व्यावसायिक चंद्रकांत गालापा आपल्या गावावरून कोल्हापूरकडे दुचाकीवरून जात होता. दरम्यान, त्याने आपल्या अल्पवयीन मुलास दुचाकी चालविण्यास दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे उपनिरीक्षक नायकवडी यांनी हे प्रकरण निपाणी न्यायालयात दाखल केले.

न्यायालयाने दि.12 रोजी निकाल देताना अल्पवयीनांकडून वाहन चालवणे ही गंभीर बाब असून यामुळे जीवितहानीचे धोके वाढतात. त्यामुळे केवळ वाहन चालवणाऱ्या अल्पवयीनांवर नव्हे तर वाहनाची जबाबदार असलेल्या वाहन मालकावरही कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. दरम्यान, चंद्रकांत गालाप्पा यांनी दंड भरल्यानंतर पोलिसांनी जप्त केलेली दुचाकी गुरुवारी न्यायालयाच्या परवानगीने त्यांच्याकडे सुपूर्द केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news