मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणी

उद्योजक खून प्रकरण ः पत्नीसह पाचजणांविरोधात खुनाचा गुन्हा; पुढील प्रक्रिया पीएम अहवालानंतरच
Belgaon News
बेळगाव ः दफन केलेला मृतदेह बाहेर काढून त्या ठिकाणी उत्तरीय तपासणी करताना वैद्यकीय पथक तसेच पोलिस अधिकारी व मृताचे नातेवाईक.Pudhari Photo
Published on
Updated on

बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा

आठवड्यापूर्वी नैसर्गिक मृत्यू ठरवलेल्या प्रकरणात मृताच्या मुलीने खुनाची तक्रार दिल्याने उद्योजक संतोष पद्मण्णवर प्रकरणाला वेगळेच वळण लागले. खुनाचा गुन्हा दाखल करून घेत पुरलेला मृतदेह बाहेर काढून बुधवारी तेथेच उत्तरीय तपासणी करण्यात आली. यानंतर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले. मृताच्या पत्नीसह पाच जणांविरोधात माळमारुती पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. संतोष दुंडाप्पा पद्मण्णवर (वय 48, रा. अंजनेयनगर) यांचा 9 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. परंतु, हा नैसर्गिक मृत्यू नसून, वडिलांचा खून झाल्याची तक्रार त्यांची मुलगी संजना संतोष पद्मण्णवर (वय 19) हिने मंगळवारी माळमारुती पोलिस ठाण्यात जाऊन केली. यानंतर तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून घेतला. यामध्ये मृताची पत्नी उमा संतोष पद्मण्णवर (वय 41, रा. अंजनेयनगर), शोबीतगौडा (रा. बेळगाव), घरातील कामगार नंदा कुरीया, प्रकाश कुरीया व अन्य एक अनोळखी यांचा समावेश आहे. यापैकी दोघेजण बंगळूरला असल्याचे समजल्यावरून पोलिसांनी तेथून त्यांना ताब्यात घेतले आहे.

Belgaon News
सातारा : बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

सीसीटीव्ही फुटेज गायब

हा मृत्यू 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात ते आठच्या सुमारास झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. घरात सीसीटीव्ही आहेत. परंतु, या एक तासाचे सीसीटीव्ही फुटेज डिलिट केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. पत्नीसह अन्य चौघांनी संगनमत करून हा खून केल्याचे फिर्यादीत नमूद असून पोलिसांनी तसा एफआयआर करून घेतला आहे. उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे.

जागेवरच उत्तरीय तपासणी

ज्याच्यावर अंत्यसंस्कार झाले त्याचा खून झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांना या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी न्यायालयीन परवानगी घ्यावी लागते. सदर व्यक्तीचा दफनविधी झाला असल्याने न्यायालयाने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीची परवानगी दिली. त्यानुसार बुधवारी सकाळी अकरा वाजता सदाशिवनगर येथील लिंगाय स्मशानभूमीत दफन केलेला मृतदेह बाहेर काढला. यानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तसेच अन्य तज्ज्ञांना बोलावून येथेच उत्तरीय तपासणी करण्यात आली. यानंतर पुन्हा मृतदेहाचे दफन करण्यात आले. यावेळी मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक, माळमारुती ठाण्याचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, सरकारी डॉक्टरांचे पथक, मृताचे नातेवाईक उपस्थित होते. यावेळी संपूर्ण घटनेचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही करण्यात आले.

Belgaon News
जालना : महापालिकेच्या जलकुंभातील पाण्यात आढळळा युवकाचा मृतदेह
मृताच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार एफआयआरमध्ये संशयितांची नावे घातलेली आहेत. परंतु, हा खूनच आहे की नैसर्गिक मृत्यू हे मात्र उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. तो अहवाल आल्यानंतर त्यामध्ये जे कारण येईल, त्यानुसार संशयितांना अटक करायची की नाही, हे स्पष्ट होईल.
-याडा मार्टिन मार्बन्यांग, पोलिस आयुक्त

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news